महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे - Famous Religious places in Gondia District of Maharashtra
गोंदिया जिल्ह्या विषयी थोडी माहिती -
महाराष्ट्रात या वेळी अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यांपैकी १ जिल्हा हा गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व भागात स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशाचं एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण या जिल्ह्याला पूर्वेकडून छत्तीसगढ राज्याचा राजनांदगाव जिल्हा आणि उत्तरी सीमेला मध्यप्रदेश राज्याचा बालाघाट जिल्हा लागून आहे. हा जिल्हा दुर्गम प्रदेशात वसलेला आहे भरपूर जंगल, पर्वतरांगा, नदया तसेच अनेक तलाव या जिल्हयाचे शोभिवंत वाढवतात. या जिल्ह्यात पर्यटकांना आपल्याकडे ओढून आणण्यासाठी काही धार्मिक स्थळे आहेत त्यांची माहिती आपण पाहणार आहोत .
गोंदिया जिल्याची स्थापना महाराष्ट्रातील भंडारा या जिल्याचे दोन भाग करून १ मे १९९९ ला करण्यात आली. या जिल्ह्याचे प्रशासकीय स्थान हे गोंदिया मधेच आहे. गोंदिया जिल्ह्यात अनेक छोटे छोटे तलाव अस्तित्वात असल्या मुळे या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा तसेच या जिल्ह्यात भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते व राईस मिल खूप जास्त असल्यामुळे या जिल्ह्याच्या ठिकाणाला 'Rice City' म्हणून पण ओळखला जातो.
गोंदिया जिल्यातील धार्मिक स्थळे - Famous Religious places
१. सूर्यदेव मंडोदेवी - Suryadev Mandodevi
सूर्यदेव मंडोदेवी हे एक हिंदू मंदिराचे स्थान निसर्गाच्या सानिध्यात वसलेले स्थान आहे . हे स्थान गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बघेडा या गावात आहे . हे ठिकाण गोंदिया वरून जवळपास २५ किमी अंतरावर आहे. मंडोदेवी चे मंदिर दगडांनी नैसर्गिक रित्या बनलेल्या गुहेत आहे . यात अनेक दगड एकमेकांवर नैसर्गिक रित्या असे ठेवलेले आहेत जसे कुणी अभियांत्रिकी रचना असेल . या मंदिराची स्थापना केव्हा आणि कशी झाली याच्या या प्रदेशात अनेक आख्यायिका आहेत. या मंदिराची देखरेख एका संस्थे कडून केली जाते . या मंदिर परिसरात मकर संक्रांति, नवरात्री, महाशिवरात्री या हिंदू सणांच्या दिवशी जत्रा असते . हे ठिकाण पर्यटकांचे मन आपल्याकडे आकर्षित करून अनेक पर्यटकांना आपल्याकडे ओढून आणते.
कसे पोहचाल -
या मंदिरात जायला आपल्याला रस्ते मार्गाने गोंदिया वरून गोरेगाव - मुंडीपार - गिधाडी या मार्गाने मंडोदेवी देवस्थान ला जावे लागेल direction . हे स्थान गूगल मॅप वर पाहायला इथे क्लिक करा
२. नागरा धाम - Nagra Dham (Gondia )
नागरा धाम हे स्थान गोंदिया तालुक्यातील नागरा या गावात प्राचीन शिव मंदिर आहे. इथे असलेला शिव मंदिर हे एक हेमाडपंथीय शिव मंदिर आहे . या मंदिराची स्थापना हि १५ व्या शतकातील मानली जाते. इथला मंदिर शिल्प कौशल्याचा आगडावेगडा नमुना आहे . या मंदिराला जोड नसलेले १६ स्तंभावर संपूर्ण मंदिर आहे. असेच या मंदिराच्या अवतीभवती हनुमानजी, पार्वतीजी, असे विविध देवी देवतांचे मंदिर पाहायला मिळतात . या मंदिरात आढळणारी शिवलिंग हे शुद्ध ग्रेफाइड चे बनलेले आहे याची निर्मिती वाकाटकांच्या काळातली मानली जाते.
या मंदिराजवळ महाशिवरात्री ला मोठी जत्रा असते ज्यात गोंदिया जिल्ह्यातील तसेच जावेदच्या भंडारा तसेच मध्यप्रदेश च्या बालाघाट जिल्ह्यातील लोक एकच गर्दी करतात .
कसे पोहचाल -
हे मंदिर गोंदिया वरून फक्त ५ किमी अंतरावर आहे. तसेच या ठिकाणी पोहचायला रेल्वे मार्गाची पण सुविधा आहे. त्यासाठी गोंदिया रेल्वे स्टैशन वरून बालाघाट ला जाणारी रेल्वे ने नागरा धाम या रेल्वे स्टेशन ला उतरावे लागेल तसेच बस ने जाण्या साठी बस ने जात येईल . हे स्थान गुगळे मॅप वर पाहण्यासाठी
इथे क्लिक करा.
3. श्री चक्रधर स्वामी मंदिर डाकराम सुकडी - Chakradhar Swami Temple Dakram Saukadi
महानुभव पंथाचे आद्य दैवत श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकडी या गावी आहे . वर्षाच्या एप्रिल महिन्यात चैत्र जत्रा हे या ठिकाणचे आकर्षणाचे केंद्र आहे. हे ठिकाण गोरेगाव तिरोडा या रस्यावर आहे . श्री चक्रधर स्वामींनी गुजरात मधील भडोच मध्ये सुमारे ११४२ भाद्रपद महिन्यात शुद्ध द्वितीय या तिथीवर अवतार धारण करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन लोकांचे दुःख, रोग दूर करत आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानून समाजात असलेल्या अनेक अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचे निरसन केले. डाकराम सुकडी हे गाव श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन इसवी सण ११६० मध्ये झाले. या गावात सुमारे ८५८ वर्ष जुने श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असे प्राचीन मंदिर आहे. वर्षभर संपूर्ण भारतातून या स्थानाला भेट द्यायला लोक येतात. या मंदिराची विशेषता अशी आहे कि मराठीचे आद्य ग्रंथ असलेला श्री चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रात या गावात चक्रधर स्वामींनी केलेल्या अनेक लीळा आहेत. संपूर्ण लीळा चरित्रातील महत्वपूर्ण आणि आगळी वेगळी लीळा म्हणजे डाकराम व्याघ्र वृंदावन लीळा मानली जाते.
डाकराम हे गाव जंगलात वसलेले गाव आहे. हे गाव जंगलाला लागून असलेले असल्याने या गावाला वाघाची खूप भीती होती. ती भीती श्री चक्रधर स्वामींनी सिंह गर्जना करून दूर केली. वाघाला पळवून लावून गावातील लोकांना अभयदान दिले . तेव्हापासून या गावात आनंदोत्सव साजरा करण्या साठी पाच दिवसीय जत्रा सुरु केली. हि यात्रा चैत्र महिन्यात पौर्णिमेला सुरवात होऊन पंचमीला या यात्रेची समाप्ती होते . हि यात्रा सुमारे ८५० वर्षा पासून सुरु आहे तसेच या यात्रेला देशभरातून अनेक भाविक येत असतात.
कसे पोहचाल -
श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकडी या गावी आहे . हे ठिकाण गोंदिया या जिल्ह्याच्या ठिकाणावरून ४० किमी अंतरावर आहे तसेच तिरोडा या तालुक्याच्या ठिकाणावरून ११ किमी अंतरावर आहे. इथे जायला तिरोडा वरून रस्ते मार्गाने तिरोडा - गोरेगाव रोड ने जावे लागेल. हे ठिकाण
गूगल मॅप वर इथे पहा तसेच इथे पोहचण्यासाठी तिरोडा वरून
रस्ते मार्ग इथे पहा
४. प्रतापगढ - Pratapgarh (Gondia District)
प्रतापगढ हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध स्थळ आहे. महाराष्ट्र राज्यातील पुरातन आणि प्राचीन काळातील हे एक किल्ला आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे किल्ले म्हणून या किल्याला ओळखले जाते. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक एकोप्याने राहतात त्याची साक्ष यातून मिळते. गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगढ हा एक वनदुर्ग म्हणून ओळखला जातो.
हे ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव या तालुक्यात आहे. अर्जुनी मोरगाव हे गोंदिया - चंद्रपूर - बल्लारशाह या लोहमार्गावर असलेले रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणच्या जवाडपास नवेगाव राष्ट्रीय उद्यान तसेच नागझिरा अभियारण्य सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रतापगढ या ठिकाणी शिव संभू ची खूप उंच मूर्ती आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी महाशिवरात्री ला खूप मोठी जत्रा भारत असते या जत्रेला गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमधून लोकांची खूप गर्दी जमते. हे ठिकाण धार्मिक तसेच ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचे स्थान आहे.
प्रतापगढ या किल्याची चढाई किल्याच्या पायथ्यापासून २०० मीटर आहे. हा किल्ला जंगलात आहे. जंगलात असल्यामुळे या ठिकाणी जंगली प्राणी तसेच मधमाशांचे अनेक पोळे पाहायला मिळतात. जुना मार्ग दगड धोंडे पडून नष्ट झालेला आहे. डावीकडे कडे ठेवीत आपण १५ मिनिटांत तटबंदीमध्ये प्रवेश करतो. गड आणि परीसरामध्ये घनदाट जंगल आहे. या भागात अनेक जंगली प्राणी आहेत. थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरुजावर एक कबर आहे. तेथे झेंडे लावलेले दिसतात. डाव्या बाजूला तटबंदी आहे. येथून एक वाट बालेकिल्ल्यामागील भिंती कडे जाते. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णतः वेढलेली आहे. गडाची नैसर्गिक अभेद्यता येथून दृष्टीस पडते. देवगडाच्या गौंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आज तरी ओसाड पडलेला आहे.
कसे पोहचाल -
प्रतापगढ या ठिकाणी पोहचण्यासाठी आपल्याला रस्ते व रेल मार्गाने जात येईल . रस्ते मार्गाने हे ठिकाण गोंदिया वरून जवळपास ८५ किमी अंतरावर आहे तसेच अर्जुनी मोरगाव या तालुक्याच्या ठिकाणावरून १८ किमी अंतरावर आहे. रस्ते मार्गाने जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरून सुकडी - कालीमाती रस्त्याने जावे लागेल . गूगल मॅप वर या ठिकाणी जाण्यासाठी
इथे क्लिक करा. तसेच हे ठिकाण गूगल मॅप वॉर पाहण्यासाठी
इथे click करा.
टिप्पणियाँ